कराडः शेती पंपाची वाढीव वीज बिले तात्काळ कमी करावी व वीज वितरणच्या अनागोंदी कारभाराविरोधात बळीराजा शेतकरी संघटनेच्यावतीने महावितरणच्या कराड येथील उपविभागीय कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. ___ यावेळी वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महापूर व अतिवृष्टीमुळे शेतकरी अत्यंत अडचणीत सापडला आहे. शेतीमालाला भाव नाही, कर्ज व नापिकीमुळे शेतकरी मानसिक त्रासात आहे. त्यामुळे शेतकरी हा नैराश्येतून आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतोय. वीज वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभाराबाबत शेतकऱ्यांच्या मनात प्रचंड असंतोष आहे. गेली अनेक वर्षे शेतकऱ्यांनी डिपॉझिट भरुनही नवीन विज कनेक्शन मिळत नाही. जळालेला किंवा नादुरुस्त डीपी चोवीस तासांत बदलायचा असतो. परंतु सुस्तावलेले अधिकारी याकडे दुर्लक्ष करतात व शेतकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे देतात. निवेदनात पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत. पाहणी न करताच शेतकऱ्यांना विज बिले दिली आहेत मीटरवर किती लाईट वापरली आहे याचे रिडींग नंबर नाहीत तर त्यामुळे विज बिले दुप्पट अवास्तव आलेली आहेत. ती बिले तात्काळ शेतकर्यांना कमी करून द्यावीत. प्रलंबित शेतीपंपाची वीज कनेक्शन तात्काळ द्यावीत. पुरामुळे, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे सरकारने सातबारा कोरा करण्याबरोबरच पुर्ण विज बिले -पोतलेच्या कमी शेतीपंपाची शेतकरी संघटनेचे पदाधिकारी माफ करावीत. शेतीपंपाची विज बीले दोन दोन वर्षांनी न देता तीन महिन्यांनी द्यावी. यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला, सुनील कोळी, अनिल घराळ, उत्तम आण्णा खबाले, सागर पोतलेच्या वांग कांबळे, पोपटराव थोरात, युवराज पाटील, संजय यादव, सचिन देसाई, दिपक मोरे, अधिक पाटील, बाळा सत्रे, रणजित पाटील, अजय पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
कराडला वीज वितरण कंपनी विरोधात आंदोलन -